ड ॅ डी कूल कूल कूल शाहरुख खान आणि अनुपम खेर यांचा ‘चाहत’ नावाचा पिक्चर तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलाय ? पाहिला नसेल तर तुम्ही नशीबवान आहात कारण आवर्जून पहावं अस त्यात काहीही नाही. याच भिकार चित्रपटात “ड ॅ डी कूल कूल कूल” असे एक टुकार गाणे आहे. पण मध्यमवर्गीय मराठी माणसाला ‘टाकाऊतून टिकाऊ’ शोधण्याचे इतके आकर्षण असते कि मी या गाण्यातून आयुर्वेदाचा एक सिद्धांत शोधून काढलाय त्यावरचा हा लेख. अरे बाप रे “ मै तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हू ँ ” हे आम्हाला बॉलीवूडने इतक्या वेळा ऐकवले कि आई बाप होणे म्हणजे बाजारातून भाजी आणण्याइतकी सोपी गोष्ट वाटायचे. पण वास्तव मात्र अत्यंत गंभीर आहे. १९४० च्या दशकात पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंची संख्या १४० दशलक्ष/मिली इतकी होती. १९५० च्या दशकात हे प्रमाण १२० दशलक्ष/मिली इतके झाले पुढे ९० च्या दशकात हे प्रमाण ६० दशलक्ष/मिली इतके कमी झाले. याचा सरळसरळ अर्थ असा होतो कि १९४० ते १९९० या ५० वर्षात पुरुषांची प्रजननक्षमता ५० %ने कमी झाली. नवीन शतकात तरी हि घसरण अधिक वेगाने होऊ लागली. १९७३ ते २०११ या कालावधीत जगभरातील वेगवेगळ...
Logical interpretation of the Ayurved's wisdom