Skip to main content

Posts

Showing posts with the label Ayurved
तुमच्या मुलाला झोपेत लघवी करण्याचा त्रास आहे का ? मग डॉ. पुष्कर वाघ यांचा हा लेख नक्की वाचा. ती फुलराणी फुलराणी परवाच येऊन गेली. तसं आईबाबांनी तिचं नाव ‘सायना’ ठेवलेलं म्हणून माझ्यासाठी ती फुलराणी. आता पुष्कळ बरी आहे. गोड हसत होती. मस्त वाटलं. फुलणारी फुलं आणि हसणारी मुलं बघून आनंद होणारच. पण चार महिन्यांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. इवल्याशा डोळ्यात अविश्वास साठवत आईबाबांसोबत ती माझ्या कन्सल्टिंगमध्ये शिरली. लहान मुलं आली कि मी आईबाबांशी न बोलता डायरेक्ट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला डॉक्टर काका महत्त्व देतात हे समजले कि हि मुलंही आपणहून व्यवस्थितपणे हिस्ट्री देतात. पण फुलराणी काही मला दाद देईना. मी दोन तिनदा प्रयत्न करूनही ती काही बोलली नाही हे पाहिल्यावर तिच्या आईने स्ट्राईक स्वतःकडे घेतला. “मी सांगते डॉक्टर, आता ही तिसरीत आहे आणि अजूनही गादी ओली करते. कधी कधी तर एका रात्रीत दोनदोन वेळा. मी पण जॉब करते त्यामुळे सारख रात्री उठायचा कंटाळा येतो हो. हिचा लहान भाऊ आहे चार वर्षांचा त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि हिची ही तऱ्हा. कुठे बाहेरगावी जायचं म्हटलं क...
ड ॅ डी कूल कूल कूल शाहरुख खान आणि अनुपम खेर यांचा ‘चाहत’ नावाचा पिक्चर तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलाय ? पाहिला नसेल तर तुम्ही नशीबवान आहात कारण आवर्जून पहावं अस त्यात काहीही नाही. याच भिकार चित्रपटात “ड ॅ डी कूल कूल कूल” असे एक टुकार गाणे आहे. पण मध्यमवर्गीय मराठी माणसाला ‘टाकाऊतून टिकाऊ’ शोधण्याचे इतके आकर्षण असते कि मी या गाण्यातून आयुर्वेदाचा एक सिद्धांत शोधून काढलाय त्यावरचा हा लेख. अरे बाप रे “ मै तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हू ँ ” हे आम्हाला बॉलीवूडने इतक्या वेळा ऐकवले कि आई बाप होणे म्हणजे बाजारातून भाजी आणण्याइतकी सोपी गोष्ट वाटायचे. पण वास्तव मात्र अत्यंत गंभीर आहे.  १९४० च्या दशकात पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंची संख्या १४० दशलक्ष/मिली इतकी होती. १९५० च्या दशकात हे प्रमाण १२० दशलक्ष/मिली इतके झाले पुढे ९० च्या दशकात हे प्रमाण ६० दशलक्ष/मिली इतके कमी झाले. याचा सरळसरळ अर्थ असा होतो कि १९४० ते १९९० या ५० वर्षात पुरुषांची प्रजननक्षमता ५० %ने कमी झाली. नवीन शतकात तरी हि घसरण अधिक वेगाने होऊ लागली. १९७३ ते २०११ या कालावधीत जगभरातील वेगवेगळ...
अम्लपित्त - घरगुती उपचार जटायूंचा आयुर्वेद घरातल्या घरात सहज उपलब्ध पदार्थांपासून बनवली जाणारी असणाऱ्या घरगुती औषधे हे आयुर्वेदाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक. इतकी वर्ष आजीबाईच्या बटव्यामध्ये दडून बसलेल्या या औषधांचे स्थान आज जागतिक आरोग्य संघटना (WHO) देखील मान्य करत आहे. आजकाल घरातून ‘आज्या’ आणि त्यांचा ‘बटवा’ दोन्ही हद्दपार झालेल्या आहेत.  अशा वेळी या घरगुती औषधांची मक्तेदारी काही जटाधारी मंडळींकडे आलेली आहे. रोज सकाळी अनेक जण या जटायुंच्या “जटायुर्वेदाचे” धडे गिरवत असतात. कॅन्सरपासून हृदयविकारापर्यंत प्रत्येक आजारावरचे तोडगे या मंडळींना तोंडपाठ असतात. असा हा ‘तोडपाणी’ आयुर्वेद नक्कीच ‘स्वागतार्ह’ नाही. घरगुती औषधे हा आयुर्वेदाच्या केवळ प्रथमोपचारातील एक भाग आहे. आयुर्वेद म्हणजे फक्त घरगुती औषधे नव्हे. नुसती औषधांची नावे माहित झाली म्हणजे आयुर्वेद कळला असे नाही. कुठले औषध कुणाला, का, किती वेळ, कधी, किती प्रमाणात, कुठल्या अनुपानातून द्यायचे अशी परिपूर्ण माहिती असणे म्हणजे खरा आयुर्वेद. या आधीच्या लेखात आपण GERD आणि अम्लपित्त यांची ओळख करून घेतली. या लेखात ...
आता वाजले कि बारा मागील लेखात आपण GERD या आजाराची ओळख करून घेतली. अन्ननलिका आणि जठर यांच्या मध्ये असणाऱ्या लोअर इसोफेजियल स्फिंक्टर’ (LES) या व्हॉल्वचे कार्य बिघडल्याने जठरातील अन्न अन्ननलिकेत परत येऊन त्यामुळे त्यामुळे छातीत जळजळ, मळमळणे अशी लक्षणे निर्माण होतात ते म्हणजेच GERD. हा आजार आणि आयुर्वेदातील ‘ऊर्ध्वग अम्लपित्त’ यातील साम्यसुध्दा अभ्यासले. या लेखात आपण GERD किंवा अम्लपित्त टाळण्यासाठी काय नियम पाळले पाहिजेत हे पाहूया. पथ्यापथ्य संकल्पना फक्त आयुर्वेदातच आहे असे नाही तर ॲ लोप ॅ थीनेसुद्धा काही विशिष्ट आजारांमध्ये पथ्यासंबंधी मार्गदर्शन केलेले आहे. पण दिवसेंदिवस हा विचार मागे पडत चालला आहे. आयुर्वेदात सांगितलेले अम्लपित्त विकाराचे पथ्य आणि आधुनिक वैद्यकात सांगितलेले GERDशी संबंधित जीवनशैलीतील बदल या दोघांचा समन्वय साधून तयार केलेले १२ नियम आपण पाहूया. १) विशिष्ट अन्नपदार्थ खाल्ल्याने GERD किंवा अम्लपित्ताची लक्षणे वाढतात. विरुध्द आहार – काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर ते शरीरातील दोषांना चाळवतात अशा आहाराला ‘विरुध्द आहार’ असे म्हणतात. मिल्क शेक, दु...