Skip to main content

Posts

Showing posts with the label Sesame
तिळा तिळा दार उघड दिवाळीच्या सुमारास सुरु झालेली ‘गुलाबी’ थंडी मार्गशीर्ष संपता संपता ‘बोचरी’ होऊ लागते. वाढलेल्या थंडीमुळे हवेतही कोरडेपणा निर्माण होतो; अशा वातावरणात आतली आर्द्रता टिकून राहावी म्हणून झाडं आपली पानं गाळून टाकतात. हेमंतातली निसर्गाची शोभा शिशिर पार घालवून टाकतो. आपलंसुध्दा तसंच आहे दिवाळीच्या खरेदीसाठी खर्च करून खिसे रिकामा झालेला माणूस शिशिरातल्या पानं गळलेल्या झाडाइतकाच केविलवाणा वाटतो. शिशिर ऋतूत वातावरणात थंडपणा आणि रुक्षता एकाच वेळी वाढते. अशा वेळी शरीराला गरम आणि स्निग्ध अशा स्निग्ध पदार्थाची गरज असते. नेमकं हेच कॉम्बिनेशन आपल्याला तीळगुळात गवसते. तीळातला स्निग्धपणा आणि गुळातला गोडवा उत्तरायण सुरु झाल्याची ग्वाही देतो. तीळातीळाने दिवस वाढत जाईल आणि पुन्हा एकदा वसंत बहरेल याचे आश्वासन मिळते. सॅच्युरेटेड फॅट, अनसॅच्युरेटेड फॅट, कोलेस्टेरॉल हे शब्द आजकाल सर्वांच्याच तोंडी बसलेले आहेत. सोयाबीन ऑईल, ऑलिव्ह ऑईल, अव्हॅकॅडो ऑईल हीच जगातली सर्वश्रेष्ठ तेलं आहेत हे जाहिरातीपासून ते कुकरी शोज् पर्यंत दररोज मनावर ठसवलं जातंय. त्यामुळेच डॉक्टर कुठलं तेल खाऊ ? जव...