तुमच्या मुलाला झोपेत लघवी करण्याचा त्रास आहे का ? मग डॉ. पुष्कर वाघ यांचा हा लेख नक्की वाचा. ती फुलराणी फुलराणी परवाच येऊन गेली. तसं आईबाबांनी तिचं नाव ‘सायना’ ठेवलेलं म्हणून माझ्यासाठी ती फुलराणी. आता पुष्कळ बरी आहे. गोड हसत होती. मस्त वाटलं. फुलणारी फुलं आणि हसणारी मुलं बघून आनंद होणारच. पण चार महिन्यांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. इवल्याशा डोळ्यात अविश्वास साठवत आईबाबांसोबत ती माझ्या कन्सल्टिंगमध्ये शिरली. लहान मुलं आली कि मी आईबाबांशी न बोलता डायरेक्ट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला डॉक्टर काका महत्त्व देतात हे समजले कि हि मुलंही आपणहून व्यवस्थितपणे हिस्ट्री देतात. पण फुलराणी काही मला दाद देईना. मी दोन तिनदा प्रयत्न करूनही ती काही बोलली नाही हे पाहिल्यावर तिच्या आईने स्ट्राईक स्वतःकडे घेतला. “मी सांगते डॉक्टर, आता ही तिसरीत आहे आणि अजूनही गादी ओली करते. कधी कधी तर एका रात्रीत दोनदोन वेळा. मी पण जॉब करते त्यामुळे सारख रात्री उठायचा कंटाळा येतो हो. हिचा लहान भाऊ आहे चार वर्षांचा त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि हिची ही तऱ्हा. कुठे बाहेरगावी जायचं म्हटलं क...
Logical interpretation of the Ayurved's wisdom