Skip to main content

Posts

Ayush Digestive Solutions Presents Certificate course in Ayurvedic Gastroenterology “Unique opportunity to sharpen your clinical skills in Ayurvedic Gastroenterology” Syllabus ·          History taking & general considerations in Gastroenterology (Ayurvedic & Modern) ·          Oral diseases – Modern diagnostic skills & Ayurvedic treatment approach ·          अम्लपित्त GERD & Beyond  - Detailed samprapti, treatment plan, dietary restrictions ·          Irritable Bowel Syndrome (IBS) – Bread & butter for Ayurvedic physician ·          Inflammatory Bowel Disorders  (Crohn’s disease, Ulcerative colitis) ·          Gall stones – What are strengths & weakness of Ayurvedic treatment ·...
Recent posts
उन्हाळ्यातील पथ्य आणि अपथ्य अन्नवर्ग पथ्य (खाण्यायोग्य पदार्थ) अपथ्य (टाळण्याचे पदार्थ) तृणधान्य गहू, तांदूळ, ज्वारी, नाचणी बाजरी कडधान्य मूग,मटकी, मसूर चणे, वाटाणे, उडीद, छोले, राजमा भाज्या दुधीभोपळा, लाल भोपळा, दोडके, घोसाळे, पडवळ, कोहळा, भेंडी, तोंडली वांगी, कारले, मेथी दुध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हशीचे दुध, तूप, लोणी दही, ताक फळे आंबा, कलिंगड, खरबूज, डाळिंब, ताडगोळे, केळी पपई, संत्रे, मोसंबी पाणी माठातले पाणी, धान्यक हिम, वाळा घातलेले पाणी फ्रीज मधले पाणी सरबत लिंबू, आवळा, कोकम सरबत खर्जूर मंथ, सातूचा मंथ इतर श्रीखंड, मुरांबा, नारळाच्या वड्या, गुलकंद, शेवयांची खीर, नारळ भात लोणचे, चायनीज, पाणीपुरी, वेफर्स इ. मसाल्याचे पदार्थ हळद, जिरे, लवंग, बडीशेप, धणे लाल तिखट, मिरे, आले ...
तुमच्या मुलाला झोपेत लघवी करण्याचा त्रास आहे का ? मग डॉ. पुष्कर वाघ यांचा हा लेख नक्की वाचा. ती फुलराणी फुलराणी परवाच येऊन गेली. तसं आईबाबांनी तिचं नाव ‘सायना’ ठेवलेलं म्हणून माझ्यासाठी ती फुलराणी. आता पुष्कळ बरी आहे. गोड हसत होती. मस्त वाटलं. फुलणारी फुलं आणि हसणारी मुलं बघून आनंद होणारच. पण चार महिन्यांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. इवल्याशा डोळ्यात अविश्वास साठवत आईबाबांसोबत ती माझ्या कन्सल्टिंगमध्ये शिरली. लहान मुलं आली कि मी आईबाबांशी न बोलता डायरेक्ट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला डॉक्टर काका महत्त्व देतात हे समजले कि हि मुलंही आपणहून व्यवस्थितपणे हिस्ट्री देतात. पण फुलराणी काही मला दाद देईना. मी दोन तिनदा प्रयत्न करूनही ती काही बोलली नाही हे पाहिल्यावर तिच्या आईने स्ट्राईक स्वतःकडे घेतला. “मी सांगते डॉक्टर, आता ही तिसरीत आहे आणि अजूनही गादी ओली करते. कधी कधी तर एका रात्रीत दोनदोन वेळा. मी पण जॉब करते त्यामुळे सारख रात्री उठायचा कंटाळा येतो हो. हिचा लहान भाऊ आहे चार वर्षांचा त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि हिची ही तऱ्हा. कुठे बाहेरगावी जायचं म्हटलं क...
डॉक्टर आणि बेडूक काल सकाळी सकाळीच राहुल भेटला. मी लेकीला शाळेच्या व्ह ॅ नमध्ये बसवून घरी निघालो होतो. तेव्हा हा माझा एके काळचा शाळेतला मित्र आणि सध्याचा कॉर्पोरेटमधला चाकरमानी समोर आला. राहुल – Happy Doctor’s Day मी – Thank You अरे पण राव्हल्या तू कधीपासून एवढा फॉर्मल झालास? राहुल – कॉर्पोरेट बाबा कॉर्पोरेट भल्याभल्यांना बदलून टाकते. बाकी काय मग आज एकदम खुशीत ? मला कळलंय हा “डॉक्टर्स डे” एक जुलैला का असतो ते. मी – (याचं जनरल नॉलेज कधी सुधारलं? मी मनात म्हटले) सांग बरं काय कारण ? राहुल – अरे बाबा, एक जुलै म्हणजे कन्फर्म पाऊस आणि एकदा पाऊस सुरु झाला कि दोन प्राणी प्रचंड खूष होतात. एक बेडूक आणि दुसरा डॉक्टर. दोघांचा सिझन सुरु. मी तर असंही ऐकलंय कि पाऊस सुरु झाल्यावर बेडूक डबक्यात आणि डॉक्टर्स ओपीडीत आनंदाने टूणटूण उड्या मारतात म्हणे. (या वाक्याने राहुल ‘नॉर्मल’ला आला हे मी ओळखलं.) मी – अरे तसं काही नाहीये. भारतरत्न डॉ बिधानचंद्र रॉय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी १ जुलैला...... राहुल – चल, मी पळतो मला ७.३८ पकडायची आहे. तुझं नॉलेज तुझ्या पेशंटन...