पुरानी जीन्स और आजार कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक पिढीच्या भावविश्वाशी जोडलेलं एक गाणं असतं. एक काळ ‘ही चाल तुरुतुरु’ने गाजवला. तर माझ्या अगोदरच्या पिढीला ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ म्हणणारा आमिर खान आपलासा वाटला. मी कॉलेजला असताना पाकिस्तानी गायक अली हैदरने गायलेलं ‘पुरानी जीन्स और गिटार’ हे गाणं आमच्या सर्वांच्या ओठावर होतं. प्रत्येक ग ॅ दरिंगला हे गाणं असायचंच. आज कॉलेज जीवनातून बाहेर पडून एक दशक उलटून गेल्यावर मात्र प्र ॅ क्टिसमध्ये “पुरानी जीन्स और आजार” हे बघायला मिळतंय. सर्वच वयोगटातल्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये जीन्स प ॅण्ट वापरण्याचे वेड वाढत चालले आहे आणि त्यातून काही आजार वाढीस लागले आहेत. हे आजार कोणते हे पाहण्यापूर्वी आपण अगोदर या जीन्सचा जन्म कसा झाला हे पाहूया. जीन्सचे जीन्स शोधताना २४ जानेवारी १८४८ हा दिवस ‘जेम्स विल्सन मार्शल’ या सुताराचे नशीब बदलवणारा ठरला. क ॅ लिफोर्नियामधील ‘कोलोमा’ या गावी आपल्या वखारीत खणताना त्याला चक्क सोनं सापडलं. हळूहळू त्या भागातल्या बऱ्याच लोकांना जमीनीत सोनं सापडायला लागलं. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. जगभरा...
Logical interpretation of the Ayurved's wisdom