Skip to main content

भुट्टा होगा तेरा बाप





गोष्ट अमेरिकेतली आहे पण आपल्या सर्वांना बरंच काही शिकवणारी आहे. कोणे एके काळची नाही फक्त १० वर्षांपूर्वी घडलेली. कॉलेजचं शिक्षण संपवून पुढील आयुष्याची सोनेरी स्वप्ने बघणाऱ्या इयान चीनी आणि कर्टीस एलिस दोन युवकांच्या कानावर बातमी येते की “त्यांची पिढी ही अमेरिकेच्या इतिहासातील एकमेव अशी पिढी असणार आहे की ज्यांचे आयुष्यमान त्यांच्या आईवडीलांपेक्षा कमी असेल आणि याचे कारण ते खात असलेल्या आहारात दडलेले आहे.” अस्वस्थ झालेली ही मुलं खरंखोटं जाणून घेण्यासाठी एका शास्रज्ञाकडे जातात. तो त्या दोघांच्या केसांचे सम्पल तपासून सांगतो की त्यांचे केस मक्यापासून बनलेले आहेत. त्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटते. ते म्हणतात आम्ही कुठं एवढा मका खातो ? त्यानंतर ते त्यांच्या केसात हा मका आला कुठून  ? याचा शोध घ्यायला लागतात. त्यासाठी ते स्वतः एक एकर शेतात मका उगवायचे ठरवतात. त्यांच्या या शोधयात्रेवर आधारित डक्युमेंट्री म्हणजे “किंग कर्न”. सुमारे सव्वा तासाची ही  क्युमेंट्री आपल्याला कोपरखळ्या मारत हसवते, टोकदार प्रश्न विचारते आणि शेवटी विषण्ण करून सोडते. २००७ मध्ये आलेल्या या डक्युमेंट्रीने अमेरिकेत खळबळ उडवून दिली. पुढील गोष्ट जाणून घेण्यासाठी ही डक्युमेंट्री प्रत्यक्ष पहावी.

मका घ्या मका



तुम्ही म्हणाल की अमेरिकतल्या या गोष्टीचा आपल्याशी काय संबंध ? आता थोडी आकडेवारी बघू. मका पिकवणाऱ्या देशांत भारत जगात दहाव्या क्रमांकावर आहे. गेल्या दशकात मका भारतातील तांदूळ आणि गव्हानंतर तिसऱ्या क्रमांकाचे पीक आहे. लक्षात घ्या की ज्वारी आणि बाजरीचे उत्पादन मक्यापेक्षा कमी आहे. लवकरच मका हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक बनेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात मक्याचे उत्पादन इतर कोणत्याही धान्यापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. तुम्ही म्हणाल, आम्ही तर कधीतरी पावसाळ्यात भुट्टा खातो त्यापलीकडे आमचा आणि मक्याचा संबध काय ? भारतात पिकवल्या जाणाऱ्या मक्यापैकी ४९% कोंबड्यांचे खाद्य तयार करण्यासाठी वापरला जातो. १२ % पशुखाद्य बनवण्यासाठी, १३ % स्टार्च बनवण्यासाठी आणि २५ % खाण्यासाठी वापरले जाते.  खाल्ला जाणारा मकासुद्धा बहुतांश ‘प्रोसेस्ड फूड’ बनवण्यासाठी वापरला जातो.

सर्वात मका सर्वेश्वरा

आपण फक्त कधीतरी मका खातो असं वाटणाऱ्यांनी खालील यादी जरा नीट बघावी. बेबी कर्न, स्वीट कर्न सूप, मक्याचे पटिस, कर्न फ्लेक्स, मसाला कर्न, मक्के की रोटी, कर्न पुलाव, कर्न चीझ बल्स, कर्न चाट, कर्न सॅण्डवीच, कर्न कबाब, कर्न चीझ टोस्ट, कर्न शेझवान फ्राईड राईस, स्वीट कर्न खीर आणि सगळ्यांना आवडणारे पप कर्न. कोणत्याही छोट्या शहरातील रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड बघा तुम्हाला या डिशेस आढळतील. हल्लीची तरूण पिढी आठवड्यातून दोनदा तरी यातलं काहीतरी खाते. हे झालं मक्याच दृश्य रूप. अदृश्य रूपाविषयी ऐकलं तर तुम्हाला मक्याचे खरे ‘विश्वरूपदर्शन’ घडेल. घरोघरी रोज खाल्ले जाणारे ब्रेड, बिस्किट्स, कुकीज, केक, टोमटो सस, रेडी टू इट सूप्स, लहान मुलांचे आवडते जम, जेली, न्युट्रीशन बार, आईसक्रिम, फ्लेवर्ड योगर्ट, सलाड ड्रेसिंग, पिझ्झा बेस या सर्वांमध्ये कर्न फ्लोअर (मक्याचे पीठ) किंवा हाय फ्रुक्टोज कर्न शुगर (HFCS) (मक्यापासून बनवलेली साखर) असते.

HFCS मीठा जहर

एरीयेटेड कोल्ड ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, हेल्दी  म्हणून प्यायले जाणारे पकबंद नचरल फळांचे रस या सर्वात स्वीटनर म्हणून साखरेऐवजी HFCS वापरले जाते. गेल्या ३० वर्षांत अमेरिकेतल्या लोकांचे साखर खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि त्याची जागा HFCS ने  घेतली आहे. तरीसुद्धा अमेरिकेत गेल्या ३० वर्षात लठ्ठपणा, डायबेटीस, हृदयरोग, लिव्हरचे रोग यांचे प्रमाण वाढत आहे. अनेक शास्रज्ञांच्या मते याचे कारण HFCS आहे. खरी गोष्ट ही आहे की HFCS हे साखरेपेक्षाही अधिक घातक आहे. तरीही फूड इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात HFCS वापरते कारण ते साखरेपेक्षा स्वस्त आहे. HFCS मध्ये मोठ्या प्रमाणात असणाऱ्या फ्रुक्टोजमुळे पोट पूर्ण भरले नाही अशी भावना निर्माण होते त्यामुळे अधिक खाल्ले जाते. शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात गेलेले फ्रुक्टोज वापरले गेले नाही तर त्यामुळे फटी लिव्हर निर्माण होते. काही शास्रज्ञांच्या मते अधिक HFCS खाल्ल्याने पनक्रियाचा कॅन्सर होतो. म्हणूनच अमेरिकेत आता ठराविक प्रमाणातच HFCS खावे असा प्रचार केला जातोय.

र्न फ्लेक्स – हेल्दी ब्रेकफास्ट ?

मुळात ब्रेकफास्ट ही संकल्पना भारतीय नाही. आयुर्वेदात थंडीचे दिवस वगळता इतर ऋतूत न्याहरीचा आग्रह धरलेला नाही. साधारण ९० च्या दशकापासून आपल्याकडे हेल्दी ब्रेकफास्टच्या नावाखाली कर्न फ्लेक्सचा प्रचार सुरु झाला. मुळात अमेरिकेत मका गाय आणि डुकरांचे वजन लवकर वाढावे म्हणून खायला देण्यात येतो. जो मका खाऊन डुकराचे वजन वाढते तो खाऊन माणसांचे वजन कसे कमी होईल ? पण टी.व्ही.वर एखाद्या हिरोईनने अड केली की आपण लगेच त्याच्यावर उड्या टाकतो. कर्न फ्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात HFCS असते. एखादा पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर किती वाढते हे ठरवणाऱ्या एककाला “ग्लायसेमिक इंडेक्स” म्हणतात. तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ६० आहे म्हणून भाताने डायबेटीस होतो असा प्रचार केला जातो. पण कर्न फ्लेक्सचा ग्लायसेमिक इंडेक्स तब्बल ८१ आहे. पण तरीही तो हेल्दी ब्रेकफास्ट हे कसे काय ? शिवाय एका बाऊल कर्न फ्लेक्समध्ये एका पकेट वेफर्सपेक्षा जास्त मीठ असते. कर्न फ्लेक्स दुधातून खाल्ले जातात दुध आणि मीठ असलेला पदार्थ एकत्र खाऊ नये असे आयुर्वेद सांगतो.

लवकर वाढा नष्ट व्हा

भारतात निर्माण होणाऱ्या मक्यापैकी ४९ % कोंबड्यांचे खाद्य बनवण्यासाठी तर १२ % पशुखाद्य बनवण्यासाठी वापरले जाते हे आपण पाहिले. मक्यापासून बनवलेले पशुखाद्य खाल्ल्याने त्यांचे वजन लवकर वाढते व प्राण्यांमध्ये लठ्ठपणा निर्माण होतो. या लठ्ठपणामुळे हे प्राणी आजारी पडू नयेत म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात अॅण्टिबायोटिक द्यावे लागतात. तरीही हे पशू जास्त काळ जगू शकत नाहीत म्हणून त्यांना कोवळ्या वयात मारून टाकले जाते. चरून गवत खाणाऱ्या गायीच्या रक्तात १.५ % सचुरेटेड फट असते तर मक्यापासून बनवलेले पशुखाद्य खाणाऱ्या गायीच्या रक्तात १.५ % सचुरेटेड फट असते. अशा प्रकारे मका खाऊन वाढलेल्या कोंबड्या आणि इतर पशुंचे मांस खाऊन आपली अवस्था काय होणार ?

स्वदेशी चळवळ

इतके दुष्परिणाम पाहिल्यावर आता मक्यातील पोषणमुल्यांची चर्चा करू. १०० ग्रम मक्यातून ३४२ Kcal इतकी उर्जा १० mg कल्शियम आणि २.३ mg आयर्न मिळते. त्याचवेळी १०० ग्रम ज्वारीतून ३४९ Kcal इतकी उर्जा २५ mg कल्शियम आणि ४.१ mg आयर्न मिळते. तर १०० ग्रम बाजरीतून ३६१ Kcal इतकी उर्जा ४२ mg कल्शियम आणि ८ mg आयर्न मिळते. तर १०० ग्रम नाचणीतून तब्बल ३४४ mg म्हणजे मक्याच्या ३४ पट  ल्शियम  मिळते याचा अर्थ पोषणाच्या बाबतीत आपली देशी धान्य मक्याच्या कितीतरी पुढे आहेत. ही माहिती भारत सरकारच्या “नशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रीशन, हैद्राबाद” च्या वेबसाईट वरून मिळवली आहे. याचा अर्थ देशी धान्यांचे पोषणमुल्य सरकारला व्यवस्थित माहित आहे तरीही अमेरिकेच्या मागे लागून मक्याची लागवड वाढवण्यामागे काय अर्थ ?

‘बुद्धिमान माणसासाठी सर्व जग शिक्षक असते’ असे आयुर्वेद सांगतो. पण कुणाकडून काय शिकायचे हे मात्र आपल्याला ठरवावे लागते. अमेरिकेकडून मक्याचा वसा घेण्याऐवजी कोणताही प्रश्न मुळापासून समजावून घेण्याची वृत्ती, त्यासाठी अफाट मेहनत करण्याची तयारी हे गुण स्विकारले तर नक्कीच आपले भले होईल. नाहीतर एक दिवस हा मका आपल्या शरीरातल्या पेशी पेशीमध्ये रुतून बसेल आणि “भुट्टा होगा तेरा बाप” अशी नवीन म्हण अस्तित्वात येईल.

© डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम.डी. (आयुर्वेद)
A – 5, पाम व्ह्यू, RX – 37,
MIDC, डोंबिवली (पू)
9224349827
हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती.
        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Ayush Digestive Solutions Presents Certificate course in Ayurvedic Gastroenterology “Unique opportunity to sharpen your clinical skills in Ayurvedic Gastroenterology” Syllabus ·          History taking & general considerations in Gastroenterology (Ayurvedic & Modern) ·          Oral diseases – Modern diagnostic skills & Ayurvedic treatment approach ·          अम्लपित्त GERD & Beyond  - Detailed samprapti, treatment plan, dietary restrictions ·          Irritable Bowel Syndrome (IBS) – Bread & butter for Ayurvedic physician ·          Inflammatory Bowel Disorders  (Crohn’s disease, Ulcerative colitis) ·          Gall stones – What are strengths & weakness of Ayurvedic treatment ·...
‘मंथ’ for the month शिक्षणविश्वातील ‘ग्लोबल वॉ र्मिंग’ शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला जाऊन विचारा त्याचा किंवा तिचा ‘नावडता’ महिना कोणता ? ९०% जण ‘मार्च’ हे उत्तर देतील. कारण मार्च हा परीक्षेचा महिना. (उरलेल्या १०% लोकांना ऑक्टोबरसुध्दा आवडत नाही.) थंडी संपत आल्याने उन्हाचा ताप वाढत असतो आणि सोबत हा परीक्षेचा ताप सुरु होतो. मग वर्षभर ‘विषयांपासून लांब’ राहिलेले विद्यार्थी अभ्यास ‘सिरीयसली’ घ्यायला लागतात. त्यातूनच सुरु होतात जागरणं आणि ‘जागता पहारा’ देण्यासाठी मदत करणारे चहा, कॉफीसारखे पेय. भरीस भर म्हणून परीक्षेचे पेपरही दुपारच्या वेळेतच असतात. आधीच वाढलेल्या उष्णतेत हे उन्हातून जाणं येणं अजून तापदायक ठरतं. वरील सर्व कारणांमुळे शरीरात उष्णता आणि कोरडेपणा वाढतो म्हणजेच आयुर्वेदाच्या भाषेत वात आणि पित्त दोष वाढतात. त्याचे परिणाम शरीर व मनावर दिसायला लागतात. वेळेवर भूक न लागणे, तोंड येणे, पोटात आग होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, हातपाय गरम वाटणे, ताप आल्यासारखे वाटणे, दिवसा झोप येणे, उत्साह न वाटणे, चिडचिड होणे, अभ्यासावर ‘फोकस’ करता न ये...
आपली तुपली गोष्ट गेल्या आठवड्यात तरुणांमधील वाढत्या आत्महत्या या विषयावर लिहिलेल्या “शब्दावाचून अडले सारे” या पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळाला. या आठवड्यात याच विषयाशी संबंधित एका निराळ्या पैलूवर प्रकाश टाकणार आहे. इंटरनेट आणि सोशियल मिडियाची आभासी दुनिया आजच्या तरुणाईला कशी जीवघेणी ठरतेय हे आपण पाहिले. आपण घेत असलेला आहार आपल्या मनावर परिणाम करत असतो. गेल्या ५० वर्षात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप मोठ्या प्रमाणात बदलल्या. हा बदल आपल्या विचारांवर कसा प्रभाव टाकतोय याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. तत्पूर्वी पहिल्यांदा आपण मेंदू या अवयवाची ओळख करून घेऊ. मेंदू – मेंदूला मुंग्या आणणारा अवयव एका वयस्क व्यक्तीच्या मेंदूचे वजन सुमारे १४०० ग्र ॅ म असते. मेंदूमध्ये सुमारे १०००० कोटी चेतापेशी (न्युर ॉ न्स) असतात. सेकंदाला एक या गतीने आपण हे न्युर ॉ न मोजायला सुरुवात केली तर फक्त एका मेंदूतील न्युर ॉ न मोजण्यासाठी ३१७१ वर्ष लागतील. प्रत्येक न्युर ॉ न सुमारे १०००० इतर न्युर ॉ न्सशी जोडलेला असतो. माणसाच्या मेंदूचं वजन शरीराच्या फक्त २.५ % असूनही हृदयातून बाहेर पडणाऱ्या रक्तापै...