बस्ती – दुनिया का
सबसे छोटा एसी
अगदी काही वर्षांपूर्वी ‘चैन’
समजला जाणारा आजकाल एयर कंडीशनर आज ‘गरज’ बनला आहे. एयर कंडीशनरला मराठीत
‘वातानुकूलन यंत्र’ असा सुंदर प्रतिशब्द आहे. आपल्या आजूबाजूची तापदायक असणारी हवा
आल्हादकारक करण्याचे काम एसी करतो. किमान उन्हाळ्यात तरी जीवनाचा अविभाज्य भाग
झाला आहे. पण एकदा पावसाळा सुरु होऊन वातावरणात गारवा आला की या वातानुकूलन
यंत्राची खरंच तितकी आवश्यकता असते का ? जर तुमचे उत्तर ‘नाही’ असेल तर हा लेख
तुमच्यासाठी आहे.
आयुर्वेदानुसार आपले शरीर हे
सृष्टीची छोटी प्रतिकृती आहे. त्यामुळे ज्या पंचमहाभूतांपासून सृष्टी बनलेली आहे
ती पंचमहाभूते आपल्या शरीरातही आहेत. बाह्यसृष्टीतील ज्या गोष्टी वाऱ्यामुळे घडतात
त्याच गोष्टी आपल्या शरीरात ‘वात’ नावाचा घटक अडवून आणत असतो. श्वासोच्छवास,
ह्रदयाची धडधड, सांध्यांच्या हालचाली, मलमुत्राचे विसर्जन ही शरीरातील वाताच्या
कामांची काही उदाहरणं आहेत. आपली मज्जासंस्था ही वाताच्याच अधिपत्याखाली काम करते.
पावसाळ्यात होणारे वातावरणातील
बदल शरीरातील वात बिघडवायला मदत करतात. म्हणूनच एकदा पावसाळा सुरु झाला की पोटाचे
आणि सांध्यांच्या आजारांचे पेशंट वाढायला लागतात. बिघडलेल्या वाताने खालील आजार होऊ शकतात.
v
गॅसेस, पोट फुगणे, भूक न लागणे, पोट साफ न होणे यासारखे
पचनाचे विकार
v
हाडे आणि सांध्यांचे आजार
गुडघेदुखी (संधिवात,
आमवात)
कंबरदुखी ( मणके
झिजणे, गादी सरकणे, सायटिकाचे दुखणे)
मानदुखी (मानेच्या मणक्यांची झीज)
v
मासिक पाळीशी संबंधित आजार
(PCOD, गर्भाशयातील गाठी, पाळीच्या वेळी होणारा त्रास, मेनोपॉज होताना उद्भवणारी लक्षणे
v
स्थौल्य
v
लकवा (Paralysis)
v
हृदयाचे काही विशिष्ट विकार
v
पाईल्स, फिशर यासारखे
गुदाद्वाराशी संबंधित विकार
v
किडनी स्टोन
पावसाळ्यात बिघडलेल्या वाताने हे
आजार डोक वर काढतात. या ‘प्रतिकूल’ झालेल्या या वाताला अनुकूल करणारा पावसाळ्यातील
एसी म्हणजे बस्ती. बस्ती म्हणजे औषधी द्रव्यांनी दिला जाणारा एनिमा. एनिमा म्हटलं
की बहुतेकांना पोट साफ होण्यासाठी दिला जाणारा साबणाच्या पाण्याचा किंवा
ग्लिसरीनचा एनिमा आठवतो. पण बस्ती हे प्रकरण यापेक्षा वेगळे आहे.
बिघडलेल्या वाताला शरीरातून
बाहेर काढून टाकण्यासाठी औषधी तेल, तूप किंवा काढा गुदद्वारावटे शरीरात सोडणे
म्हणजे बस्ती होय.
ही आयुर्वेदातील पंचकर्म
ट्रीटमेंटपैकी एक आहे.
आपले मोठे आतडे हे शरीरातील
वाताचे ‘हेड ऑफिस’ आहे असे आयुर्वेद सांगतो. या हेड ऑफिसमधूनच सर्व शरीरातील
वाताचे नियंत्रण केले जाते. म्हणूनच वाताला
नियंत्रित करणारे औषध मोठ्या आतड्यात सोडल्यास ते जास्त प्रभावीपणे काम करू शकते.
म्हणूनच बस्ती हा शरीरातील वाताचे अनुकूलन करणारा एसी आहे.
आयुर्वेदात बस्तीचे अनेक प्रकार
सांगितले आहेत पण मुख्य दोन प्रकार पुढीलप्रमाणे
अनुवासन बस्ती – औषधी तेलांचा बस्ती
निरूह बस्ती – औषधी काढ्यांचा बस्ती
हे अनुवासन आणि निरूह बस्ती
एका पाठोपाठ एक असे विशिष्ट क्रमाने दिले जातात.
योग बस्ती – हा आठ दिवसांचा उपक्रम असून यात ५ अनुवासन (तेल) बस्ती आणि ३ निरूह
(काढा) बस्ती दिले जातात.
काल बस्ती – हा १६ दिवसांचा उपक्रम असून यात १० अनुवासन (तेल) बस्ती आणि ६
निरूह (काढा) बस्ती दिले जातात.
कर्म बस्ती - हा ३० दिवसांचा उपक्रम असून यात १८ अनुवासन (तेल)
बस्ती आणि १२ निरूह (काढा) बस्ती दिले जातात.
कोणत्या व्यक्तीला किती दिवसांचा
बस्ती उपक्रम करणे आवश्यक आहे याचा निर्णय रुग्णाची प्रकृती आणि आजाराचे स्वरूप
यानुसार आयुर्वेदिक डॉक्टर ठरवतात.
पावसाळा सुरु झालाय तेव्हा चला
तर मग या जगातल्या सर्वात छोट्या एसी ने आपल्या शरीरातील वाताचे अनुकूलन करूया.
पावसाळ्याच्या आभाळभर शुभेच्छा !
डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ
एम. डी. (आयुर्वेद)
9224349827
drpushkarwagh@gmail.com
Comments
Post a Comment