Skip to main content

Posts

टेस्टिंग टाईम अहेड ? पुरुष वंध्यत्व या विषयावरील “ड ॅ डी कूल कूल कूल” या लेखाला उत्तम प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांचे आभार. वंध्यत्वाचे प्रमाण असेच वाढत राहिले तर हे शतक संपता संपता कदाचित मूल होण्यासाठी फक्त टेस्ट ट्यूब बेबी हा एकमेव पर्याय शिल्लक राहिल अशी शक्यता त्या लेखामध्ये वर्तवली होती. सर्वसामान्य भाषेत टेस्ट ट्यूब म्हटल्या जाणाऱ्या या तंत्राचे शास्रीय नाव In Vitro Fertilization (IVF) असे आहे. दरम्यान ‘ Politics of the Womb ’ (गर्भाशयाचे राजकारण) या नावाचे पिंकी विराणी या लेखिकेने लिहिलेले पुस्तक हातात आले. IVF तंत्रामध्ये असणारे धोके समजावून सांगणारे तसेच प्रजनन तंत्रातील सत्यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे. उपरोक्त पुस्तकात मांडलेले विचार शास्रीय संदर्भांसहित मांडलेले असल्यामुळे या पुस्तकाचा आधार घेऊन हे लिखाण करत आहे. कसं करतात IVF ? सर्वप्रथम आपण IVF प्रक्रिया थोडक्यात समजावून घेऊ. पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीचे अंडे एका निर्जंतुक काचेच्या ताटलीत (पेट्री डिश) एकत्र केले जाते. हे मिलन यशस्वी ठरले तर त्या फलित अंड्याचं (Zygote) स्रीच्या गर्भाशयामध्ये ...
ड ॅ डी कूल कूल कूल शाहरुख खान आणि अनुपम खेर यांचा ‘चाहत’ नावाचा पिक्चर तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलाय ? पाहिला नसेल तर तुम्ही नशीबवान आहात कारण आवर्जून पहावं अस त्यात काहीही नाही. याच भिकार चित्रपटात “ड ॅ डी कूल कूल कूल” असे एक टुकार गाणे आहे. पण मध्यमवर्गीय मराठी माणसाला ‘टाकाऊतून टिकाऊ’ शोधण्याचे इतके आकर्षण असते कि मी या गाण्यातून आयुर्वेदाचा एक सिद्धांत शोधून काढलाय त्यावरचा हा लेख. अरे बाप रे “ मै तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हू ँ ” हे आम्हाला बॉलीवूडने इतक्या वेळा ऐकवले कि आई बाप होणे म्हणजे बाजारातून भाजी आणण्याइतकी सोपी गोष्ट वाटायचे. पण वास्तव मात्र अत्यंत गंभीर आहे.  १९४० च्या दशकात पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंची संख्या १४० दशलक्ष/मिली इतकी होती. १९५० च्या दशकात हे प्रमाण १२० दशलक्ष/मिली इतके झाले पुढे ९० च्या दशकात हे प्रमाण ६० दशलक्ष/मिली इतके कमी झाले. याचा सरळसरळ अर्थ असा होतो कि १९४० ते १९९० या ५० वर्षात पुरुषांची प्रजननक्षमता ५० %ने कमी झाली. नवीन शतकात तरी हि घसरण अधिक वेगाने होऊ लागली. १९७३ ते २०११ या कालावधीत जगभरातील वेगवेगळ...
मुखवटे आणि चेहरे आपण यांना पाहिलंत का ? रुग्ण क्र. १ वयाच्या ३२ व्या वर्षी मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी आणि वाढणारे ब्लड प्रेशर या दोन तक्रारी घेऊन एक स्रीरुग्ण आली. कॉलेजमध्ये असताना अम्लपित्त होते, अधूनमधून डोकेही दुखायचे पण उलटी झाल्यावर बरे वाटायचे. ॲ लोप ॅ थिक औषधं घेऊन पित्ताचा त्रास कमी झाला पण हळूहळू डोकेदुखी वाढू लागली. तीन महिने व्यवस्थित औषध आणि पंचकर्मातील विरेचन चिकित्सा केल्यावर डोकेदुखी तर गेलीच शिवाय ब्लड प्रेशरही नियंत्रणात आलंय. रुग्ण क्र. २ सुमारे ५० – ५५ वय असलेले एक काका. पुराचे पाणी ओसरल्यानंतर कोकणातल्या जुन्या घराची स्वच्छता केली. नंतर पायांना खाज येऊन एक छोटी पुटकुळी आली. ती खाजवल्यानंतर वाहणारा स्राव हातच्या बोटांना लागून तिथे पुरळ आले. सुमारे महिन्याभरात हा प्रकार वाढत वाढत अंगभर पसरला. एक ‘जनरल प्र ॅ क्टिशनर’ आणि दोन ‘स्किन स्पेशालिस्ट’ अशी ‘त्रिस्थळी’ यात्रा करून काकांना काही बरे वाटत नव्हते. आयुर्वेदाकडे आल्यावर वारंवार होणाऱ्या अम्लपित्ताची हिस्ट्री लक्षात घेऊन दिलेल्या चिकित्सेने पूर्ण बरे वाटले आणि ‘सुस्थळी’ पडल्याचा ...
अम्लपित्त - घरगुती उपचार जटायूंचा आयुर्वेद घरातल्या घरात सहज उपलब्ध पदार्थांपासून बनवली जाणारी असणाऱ्या घरगुती औषधे हे आयुर्वेदाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक. इतकी वर्ष आजीबाईच्या बटव्यामध्ये दडून बसलेल्या या औषधांचे स्थान आज जागतिक आरोग्य संघटना (WHO) देखील मान्य करत आहे. आजकाल घरातून ‘आज्या’ आणि त्यांचा ‘बटवा’ दोन्ही हद्दपार झालेल्या आहेत.  अशा वेळी या घरगुती औषधांची मक्तेदारी काही जटाधारी मंडळींकडे आलेली आहे. रोज सकाळी अनेक जण या जटायुंच्या “जटायुर्वेदाचे” धडे गिरवत असतात. कॅन्सरपासून हृदयविकारापर्यंत प्रत्येक आजारावरचे तोडगे या मंडळींना तोंडपाठ असतात. असा हा ‘तोडपाणी’ आयुर्वेद नक्कीच ‘स्वागतार्ह’ नाही. घरगुती औषधे हा आयुर्वेदाच्या केवळ प्रथमोपचारातील एक भाग आहे. आयुर्वेद म्हणजे फक्त घरगुती औषधे नव्हे. नुसती औषधांची नावे माहित झाली म्हणजे आयुर्वेद कळला असे नाही. कुठले औषध कुणाला, का, किती वेळ, कधी, किती प्रमाणात, कुठल्या अनुपानातून द्यायचे अशी परिपूर्ण माहिती असणे म्हणजे खरा आयुर्वेद. या आधीच्या लेखात आपण GERD आणि अम्लपित्त यांची ओळख करून घेतली. या लेखात ...